दि.15 आॅगस्ट 2021 भारताच्या स्वातंत्र दिनानिमीत्त संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु) येथे समिती सदस्या सौ.अश्विनी लातुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
दि.15 आॅगस्ट 2021 भारताच्या स्वातंत्र दिनानिमीत्त संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु) येथे समिती सदस्या सौ.अश्विनी लातुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
आज दि.15 आॅगस्ट 2021 भारताच्या स्वातंत्र दिनानिमीत्त संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु) येथे समिती सदस्या सौ.अश्विनी लातुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दिपा पाटील व कर्मचार्यांनी भारत मातेचे पुजन केले. शाळेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचे आॅनलाईन देशभक्तीवर गीत गायन स्पर्ध्येचे नियोजन संगीत शिक्षक श्री योगेश्वर बुरांडे यांनी केले. जि.दिव्यांग पुनर्वसन केंद्र जुना औसा रोड लातुर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शै.साहीत्याचे वितरण करण्यात आले.प्रकल्पाचे सहकार्यवाह डाॅ.योगेश निटुरकर कोषाध्यक्ष श्री श्याम भराडिया, महानगर पालिकेचे श्री रूकमन वडगावे, श्री पांडुरंग बजाज, बसवराज पैके होते. जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र(घरोंदा) नदिहात्तरगा येथे माजी सैनिक श्री यशवंत गरगटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यांनी भारतीय लष्करात 31 वर्ष सेवा करून मेजर पदावरून निवृत्त झाले आहेत.1962 च्या भारत चीन युध्दात त्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे.या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, स्था.व्य.समितीचे अध्यक्ष डाॅ अशोक पोतदार माजी पोलीस पाटील श्री किशनमहाराज खोबरे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक, समिती सदस्य श्री रत्नदीप बोटवे, गृहपाल सचिन जाधवर , केशव तिपनबोने गुरूजी दिव्यांग मुले, पालक उपस्थित होते