दिव्यांग विध्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा दि. 30 डिसेंबर 2017 रोजी लातूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे आयोजन समाजकल्याण विभाग जि.प. लातूर यांनी केले होते. या कार्यक्रमात संवेदना शाळेतील मुलांच्या नृत्यास पारितोषिक देताना मा. जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत, समाजकल्याण अधिकारी श्री संजय दोरवे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री शिवानंद मिनगिरे, संवेदना शाळेतील मुले, विशेष शिक्षक, पालक उपस्थित होते.